कतरिनाचे लग्न झाल्याने अनेकजण हळहळले होते, अशी चर्चा आहे. पण ‘कॅट’च्या कैफात बुडालेल्या मजनूंसाठी एक खुश खबर आहे. सोशल मीडियावर एका मॉडेलचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील मॉडेल हुबेहूब कतरिनासारखी दिसत असल्यामुळे चाहतेही पेचात पडले आहेत. या कॅटसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीमुळे काहीजण सुखावले (दुधाची तहान ताकावर) आहेत. ‘कॅट’ची कॉपी वाटणाऱ्या या मॉडेलचे नाव अलिना राय असे आहे. अलिनाचे डोळे, चेहऱ्याची ठेवण पाहता प्रथमदर्शनी ती कतरिनाच असल्याचा भास होतो. ‘टिकटॉक’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे अलिना पहिल्यांदा चर्चेत आली होती. कतरिनासारखी दिसत असल्यामुळे तिचे रिल्स प्रचंड व्हायरल झाले होते. भारतात टिकटॉकवर बंदी आल्यानंतर अलिनाने इन्स्टाग्रामवर रिल्स बनवायला सुरुवात केली. अलिना सोशल मीडियीवर सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर ७२ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. आपले ग्लॅमरस फोटो अलिना इन्स्टाग्रामवरून शेअर करत असते. एका कार्यक्रमादरम्यानचे तिचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. मॉडेलिंग करणारी अलिना अभिनेत्रीसुद्धा आहे. अलिनाने बॉलिवूड चित्रपटातही काम केले असून ‘लखनऊ जंक्शन’ या चित्रपटातून अलिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २८ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. शिवाय तिने शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे.
‘परी’ पैठणीत दिसतेय क्यूट!
नुकतेच मायराने एक खास फोटोशूट केले आहे. झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. मालिकेतील ‘परी’ या चिमुकलीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. ‘परी’ची भूमिका बालकलाकार मायरा वायकुळ साकारत आहे. मायरा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. नुकतेच मायराने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये मायराने गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसली आहे. साडीमध्ये मायराने हटके पोझ दिल्या आहेत. गुलाबी पैठणी साडीमध्ये मायरा खूपच क्यूट दिसत आहे. मायराने चांदीच्या दागिन्यांचा साज केला आहे. मायराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सईचा ‘तो’ आहे तरी कोण?
मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्यूटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. वेगवेगळ्या भूमिकांमुळे सई प्रकाशझोतात असते. आतादेखील ती ‘एका’ला डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा सिनेवर्तुळात रंगल्या आहेत. तिच्या या कथित बॉयफ्रेंडचे नाव अनिश जोग असून सोशल मीडियावर सई-अनिश जोडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सईने नुकताच अनिशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे. याआधीही तिने अनिशचा फोटो शेअर करत “मी कशाप्रकारे तुला ब्लश करायला भाग पाडते ना..!” असे म्हटले होते. अनिश नेमका कोण आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध निर्माता आहे. त्याने ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, ‘YZ’, ‘टाइम प्लीज’ अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे.
दीपक परब