नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामाला येत्या २० सप्टेंबर रोजी सुरुवात होणार आहे. या लीगचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. यावेळी चार संघात ही स्पर्धा रंगणार आहे. या लीगच्या दुसऱ्या हंगामात वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युसूफ पठाण, मुथय्या मुरलीधरन, मॉन्टी पानेसर, प्रवीण तांबे, नमन ओझा, एस बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, असगर अफगान यांसारखे खेळाडून खेळणार असल्याचे माहिती देण्यात आली होती.
मात्र आता या लीगमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत, मिस्बाह उल हक आणि केविन ओ ब्रायन यांनीही या हंगामात खेळण्याचे स्पष्ट केले आहे. टी-२० विश्वचषक २०१७ मध्ये श्रीसंतने घातक गोलंदाजी केली. या विश्वचषकात भेदक गोलंदाजी करत अनेक विरोधी संघाच्या फलंदाजाला माघारी धाडले होते. भारताने हा विश्वचषक जिंकला होता.
श्रीसंत गेल्या ९ वर्षांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र लीजेंड्स लीग क्रिकेटमधून मैदानात पुन्हा मैदानात पुनरागमन करत आहे. यावर श्रीसंतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करून आनंद होत आहे. या लीगसाठी मी खूप उत्सुक आहे. या हंगामात चांगले प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा करतोय’, असे श्रीसंतने म्हटले आहे.