लातूर (हिं.स.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या मार्फत महाराणा प्रताप नगर लातूर येथे मुलांचे अधिकार, शिक्षणाचे अधिकार, बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ या विषयी जागरुकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्या. एस.डी. अवसेकर, यांनी उपस्थित पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले व मुलींना घरात चुलीसमोर न बसवता त्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवा या बाबत सांगितले. शिक्षणाचा अधिकार या बाबत त्यांनी पालकांना व बालकांना सविस्तर माहिती दिली.
ॲड. छाया आकाते यांनी बालकांचे अधिकार या विषयाबाबत माहिती सांगितली. ॲड. अंजली जोशी यांनी लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ या बाबत माहिती दिली. ॲड. बिना कांबळे यांनी महिलांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, लातूर यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वहया व पेन वाटप करण्यात आले.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…