Wednesday, September 10, 2025

नैसर्गिक शेती परिषदेला रविवारी संबोधित करणार पंतप्रधान मोदी

नैसर्गिक शेती परिषदेला रविवारी संबोधित करणार पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार १० जुलै सकाळी साडे अकरा वाजता नैसर्गिक शेती परिषदेला डिजिटल पद्धतीने संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी मार्च २०२२ मध्ये झालेल्या गुजरात पंचायत महासंमेलनात प्रत्येक गावातल्या कमीत कमी ७५ शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करावी असे आवाहन केले होते.

पंतप्रधानांच्या याचं आवाहनाला प्रतिसाद देत सुरत जिल्ह्याने पुढाकार घेऊन तसेच अथक प्रयत्न करून पंतप्रधानाचे हे स्वप्न वास्तवात आणले. नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकरी वर्गाला प्रवृत्त करण्यासाठी सुरत शहराने शेतकरी संघटना, तलाठी, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी बँका, या क्षेत्राशी निगडीत भागीदार, शेती उद्योग आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यांना शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करायला सांगीतले.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रापंचायती मधून कमीत कमी ७५ शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देऊन नैसर्गिक शेतीसाठी करण्यासाठी प्रवृत्त केले. या शेतकऱ्यांना ९० वेगवेगळ्या समूहात प्रशिक्षण देण्यात आले अशाप्रकारे जिल्हयातून ४१,००० शेतकरी नैसर्गिक शेतीसाठी तयार झाले.

ही परिषद सुरत इथे आयोजित करण्यात आली असून या परिषदेत असे हजारो शेतकरी आणि भागिदार सहभागी होणार आहेत ज्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करून यशोगाथा लिहीली. या परिषदेला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment