नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदारांनंतर १५ खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदारांची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना नेते कृपाल तुमाणे यांच्या घरी काल (शुक्रवार) झालेल्या विशेष भोजनामध्ये शिवसेनेचे १० खासदार उपस्थित होते. यावेळी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. यावेळी भाजपाचा एक ज्येष्ठ नेताही उपस्थित होता, अशी माहिती आहे.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह आणखी ८ खासदार या भोजनाला उपस्थित होते, अशी माहिती आहे. एकूण १५ खासदार शिवसेनेतून फुटून शिंदे गटामध्ये सहभागी होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. या खासदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. शुक्रवारी रात्री दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात झालेल्या शिवसेनेच्या बंडाचे पडसाद दिल्लीतही उमटणार हे आता स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यावर खासदारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…