Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीमनसेचे आता महिला'राज'!

मनसेचे आता महिला’राज’!

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची राज्यस्तरीय कार्यकारणी जाहीर

मुंबई : आगामी काळात होणाऱ्या विविध जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आता चांगलीच कामाला लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेच्या बांधणीसाठी सध्या कोकण दौऱ्यावर असून नुकतीच मनसेने कामगार सेना, नाविक सेना आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या होत्या. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना सुद्धा आता रिंगणात उतरली असून आज महिला सेनेची “राज्यस्तरीय कार्यकारणी” मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे व रिटा गुप्ता यांनी जाहीर केली आहे.

पहिली यादी आज जाहीर करण्यात आली असून लवकरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुद्धा मध्यवर्ती कार्यकरणी जाहीर करण्यात येणार आहे.

या कार्यकारणीत महिला सेना सरचिटणीस व उपाध्यक्षा जाहीर केल्या आहेत. यात सुप्रिया दळवी, स्नेहल जाधव, सुचीता माने व दीपिका पवार यांची महिला सेना महिला सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचबरोबर मुंबई क्षेत्रातील विविध लोकसभा क्षेत्रात महिला सेना महिला उपाध्यक्षा म्हणून ग्रेसी सिंग – दक्षिण मुंबई, ऋजुता परब – दक्षिण मध्य मुंबई, सुप्रिया पवार – उत्तर मुंबई, मीनल तुरडे – उत्तर मध्य मुंबई, सुनीता चुरी – उत्तर पश्चिम, अनिषा माजगावकर – ईशान्य मुंबई यांची तर सुजाता शेट्टी यांची महिला योजना व धोरण पदी वर्णी लागली आहे.

महिला सेना मुंबई पुरती मर्यादित न राहता इतर जिल्ह्यातही फोफावली असून याच पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातही नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामध्ये अलका टेकम – यवतमाळ, रेखा नगराळे – लातूर, सोनाली शिंदे- सातारा, वर्षा जगदाळे – बीड, सुजाता ढेरे – नाशिक, दीपिका पेडणेकर – डोंबिवली, चेतना रामचंद्रन – कल्याण पूर्व व उर्मिला तांबे – कल्याण पश्चिम यांना महिला सेना महिला उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी पालिका निवडणुक तोंडावर आली असताना महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना चांगलीच तयारीला लागली असून महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असलेल्या पालिका निवडणुकीत मनसेच्या विजयात महिला सेना सिंहाचा वाटा उचलेल अशी आशा मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि रिटा गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -