 
                            सोनू शिंदे
उल्हासनगर : उल्हासनगर कँप १ येथील शहाडजवळ असलेल्या सेच्युरी रेयॉन कंपनीच्या समोरील एका दुकानात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानात अडकलेल्या तब्बल २० ते २५ महिला कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यात कंपनीच्या सुरक्षा विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. त्यांच्या तत्परतेमुळे या महिलांचे प्राण वाचल्याने त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उल्हासनगर कँप १ येथील शहाडजवळ असलेल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या लेबर गेट समोर रवि तलरेजा यांचे रॅम्बो पार्टी शॉप दुकानात शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यामुळे दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचारी यांची एकच धावपळ सुरू झाली.
सेंच्युरी रेयॉन कंपनीचे (कर्नल) सुरेश शिंदे यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी लागलीच अग्निशमन दल व सुरक्षा विभागाचे सागर बेडेकर, अमित रासकर, कमलेश सिंग, बी.डी. घाडगे, दीपक पाटील, विजय चौगुले, राहुल सोनवणे, संतोष भोसले, कैलास चव्हाण, आर.एन. पाटील, एस. पनाडकर आदी अग्निशमन दलाचे व सुरक्षा विभागाच्या जवांनानी जिवाची पर्वा न करता सदर ठिकाणी जाऊन दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या तब्बल २० ते २५ महिला कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.

 
     
    




