Wednesday, December 24, 2025

स्वातंत्र्याची व्याख्या

स्वातंत्र्याची व्याख्या

डॉ. मिलिंद घारपुरे

ठाण्यातला एक अफाट गर्दीचा चौक, वेळ रात्री साधारण १० उभा होतो कोणाची तरी वाट बघत, सिग्नलची गम्मत बघत. सिग्नलच्या रंगांचा आदेश. हिरव्या लाल पिवळ्या. लाल रंग एक रस्ता थांबतोय. हिरवा रंग एक रस्ता सुटतोय. गाड्या थांबणं, सुटणं. मधल्या वेळेत फुलांच्या गजऱ्यापासून छोट्या-मोठ्या गोष्टी विकणाऱ्यांचं सेल्स मार्केटिंग, एकदम छान, झकास!!! सगळं मस्त नीट, पक्कं नियमात. १० वाजतात, सिग्नल बंद!!! आणि.... आणि... अचानक एका मिनिटात काहीतरी चुकतं, 'केऑस'. इतका वेळ सुरळीत चालणारं ट्राफिक, अचानक गोंधळ, गडबड, गदारोळ. तब्बल पाच रस्त्यांचं जंक्शन. ट्राफिक जॅम. प्रत्येकाची यायची जायची घाई. गोंधळा-गोंधळी, ट्राफिक एकदम लॉक, कर्णकर्कश हॉर्न्स, शिव्याशाप भकारान्त मकारान्त. इ... इ...

गंमत आहे!!! नियंत्रण हवं... हवंच अगदी नक्की!!! शरीरावर, भावनांवर, मनावर, विचारांवर सतत सलग कशाचं तरी, कोणाचं तरी. नियंत्रण नसणं, हीच स्वातंत्र्याची व्याख्या? स्वैराचारी व्हायला काय, क्षणही पुरतो.

Comments
Add Comment