नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीत दाखल झाले. काल दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारने शाहांना भेटण्यासाठी पोहोचले. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.
अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.