नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत भारतात १८ हजार ८४० नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या देशात सक्रिय प्रकरणं १,२५,०२८ आहेत. अहवालानुसार देशातील दैनंदिन सकारात्मकता दर ४.१४ टक्के आहे, तर पुनर्प्राप्तीचा दर ९८.५१ आहे. १६,१०४ लोक बरे झाले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १९८.६५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
काल म्हणजेच ८ जुलै रोजी १८,८१५ प्रकरणे प्राप्त झाली असून ३८ मृत्यूची नोंद झाली. याआधी म्हणजेच, ७ जुलै रोजी १८,९३० प्रकरणे नोंदवली गेली होती, तसेच ३५ लोकांचा मृत्यू झाला होता.