रत्नागिरी (हिं.स.) : पाचांबे नेरदवाडी (ता.संगमेश्वर) येथील संजय महीपत जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने लागलेल्या आगीत १३ म्हशींचा जळून मृत्यू झाला. आगीत गोठा भस्मसात झाला आहे.
याबाबतची माहिती मिळताच गोठ्याचे तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना दिले. गोठ्यावर वीज पडून गोठ्यातील वाळलेल्या चाऱ्याने पेट घेतला. त्यामुळे गोठ्याला आग लागल्याचे पंचांनी सांगितले.
आगीत ६ मोठ्या, ३ लहान म्हशी, दोन रेडे आणि दोन वासरांचा जळून मृत्यू झाला. या घटनेत श्री. जाधव यांचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे.