Tuesday, June 24, 2025

संजय राऊतांच्या अटकेचे वॉरंट जारी

संजय राऊतांच्या अटकेचे वॉरंट जारी

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांनी, मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्यानंतर त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.


संजय राऊतांनी कुठलाही पुरावा नसताना केलेल्या आरोपांबद्दल मेधा सोमय्या यांनी गुन्हा दाखल केला होता. मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टामध्ये अब्रुनुकसानीची केस दाखल केली होती. कोर्टाने तिन दिवसांपूर्वी बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले होते. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९९, ५०० साठी वॉरंट जारी केले आहे.


आज त्या वॉरंटच्या कॉपी संजय राऊत ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या कांजूर पोलिस स्टेशनमध्ये पाठवली आहे. आता पोलिस पुढची कारवाई करतील.

Comments
Add Comment