कर्नाटक : सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपींना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून अटक करण्यात आली आहे. महांतेश शिरूर आणि मंजुनाथ मरेवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चंद्रशेखर गुरुजी यांच्या खुनामागे ५ कोटींची मालमत्ता विकल्याचे प्रकरण कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केल्यावर मालमत्तेचे पैसे का द्यायचे, अशी विचारणा मारेकऱ्याने केली आणि रागाच्या भरात मंजुनाथ मरेवाड याच्या सहकार्याने त्यांचा खून केला. चंद्रशेखर यांचा बहुतांश व्यवसाय मारेकरी महांतेश शिरूर पाहत होता. चंद्रशेखर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्याच्या नावावर केली होती.