Thursday, July 3, 2025

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, तीन गुन्हे दाखल

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, तीन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्या घरावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईसह चंदीगड येथील संजय पांडे यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली आहे.


एनएसई घोटाळाप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. सीबीआयची मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. एनएसई घोटाळ्यातील आरोपी चित्रा रामकृष्णन यांनी संजय पांडे यांना एनएसईशी संबंधित लोकांचे फोन रेकॉर्ड करण्यात सांगितले असा त्यांच्याविरोधात आरोप आहे.


एनएसईशी संबंधित व्यक्तींचे फोन टॅप केल्याचा आरोप प्रकरणी संजय पांडे यांच्या मुंबई, चेन्नई आणि चंदीगड येथील घर आणि कार्यालयावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात येत आहे. याआधी ईडीनेही त्यांना समन्स बजावले होते, त्यानंतर आता सीबीआयच्या या कारवाईमुळे संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Comments
Add Comment