जपान : पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे भाषण सुरु असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळ्या घालण्यात आल्याचे वृत्त जपानच्या वृत्तसंस्थेने दिले आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून प्रकृती चिंताजनक आहे.
जपानी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या पत्रकाराने या ठिकाणी गोळी झाडल्यासारखा आवाज ऐकला आणि शिंजो आबे जखमी झाल्याचेही पाहिले. शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण करत असताना मागून एका व्यक्तीने हल्ला केला. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
जपानची वृत्तसंस्था द जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, गोळीबारात शिंजो आबे जखमी झाले आहेत. आबे यांना दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. त्यांना छातीत एक गोळी लागली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.
आजारपणामुळे दिला होता पंतप्रधान पदाचा राजीनामा
शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिंजो आबे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत.