Tuesday, May 6, 2025

देशताज्या घडामोडी

अमरनाथ येथे ढगफुटीमुळे १० भाविकांचा मृत्यू

अमरनाथ येथे ढगफुटीमुळे १० भाविकांचा मृत्यू

श्रीनगर (हिं.स.) : अमरनाथ पवित्र गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटी होऊन मोठी हानी झाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. यात आतापर्यंत १० जणांचे मृतदेह हाती आले आहेत तर तीन जणांचा वाचवण्यात यश आले आहे. या ढगफुटीमुळे अमरनाथ यात्रेवर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


अमरनाथ यात्रेला ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. यादरम्यान शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटी झाली. या गुहेजवळ सध्या १० ते १२ हजार भाविक असल्याची माहिती मिळते आहे. ढगफुटीचे काही व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत.


यामध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर एजन्सीच्या माध्यमातून बचावकार्य राबवण्यात येत आहे, अशी माहिती आयटीबीपीने दिली. ढगफुटीमुळे पाण्याचा प्रवाह गुहेजवळूनच गेला असून यामुळे काही लंगरचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. काही भाविकही याच्या तडाख्यात सापडल्याचे सांगितलं जात आहे.

Comments
Add Comment