नवी दिल्ली : चिनी मोबाईल कंपनी व्हिवोचा संचालक झेंगशेन ओऊ आणि झांग जी देश सोडून पळून गेले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) ५ जुलै रोजी देशभरात व्हिवोच्या ४४ ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे कारवाईला घाबरून या संचालकांनी पळ काढल्याचे बोलले जातेय.
ईडीने अलीकडेच विवोविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. चिनी मोबाईल कंपन्यांवर रॉयल्टी आणि करचुकवेगिरीच्या नावाखाली देशाबाहेर पैसे पाठवल्याचा आरोप आहे. दरम्यान, चीनने आशा व्यक्त केली की, भारत कायदा आणि नियमांनुसार व्हिओ विरुद्ध चौकशी करेल. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. ईडीने यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये फेमा उल्लंघनाच्या आरोपाखाली चीनी मोबाइल कंपनी शाओमीची 5,551 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. कंपनीने आपली कमाई बेकायदेशीरपणे भारताबाहेर पाठवल्याचा आरोप होता. कंपनीने ही हेराफेरी या महिन्यात फेब्रुवारीमध्ये केली होती, त्यानंतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती.
ईडीने म्हटले आहे की टेक कंपनी चीनमधील मूळ कंपनीच्या सांगण्यावरून रॉयल्टीच्या नावाखाली एवढ्या मोठ्या रकमेचा गैरवापर करत आहे. तसेच अमेरिकेतील शाओमी ग्रुप कंपनीला पाठवण्यात आले होते. इतर चिनी कंपन्यांप्रमाणे विवो देखील आयटी आणि ईडीच्या रडारवर आहे. एप्रिलमध्ये, विवोच्या मालकी आणि आर्थिक अहवालांमध्ये तफावत आहे का हे पाहण्यासाठी चौकशी करण्यात आली होती. ईडी, सीबीआयसोबतच वाणिज्य मंत्रालयही या कंपन्यांशी संबंधित कंपन्यांवर बारीक नजर ठेवून आहे.