रत्नागिरी : दापोली तालुक्यात टांगर लघु पाटबंधारे प्रकल्पाचे टांगर धरण ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पूर्ण भरले आहे. सध्या या धरणात १०० टक्के जलसाठा झाला असून या धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरक्षितपणे वाहू लागल्याचे टांगर गावचे सरपंच प्रशांत पार्टे यांनी सांगितले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. या धरणातील पाणी पातळी ९०.६० मीटर असून सांडव्यावरील विसर्ग ३.५५ क्युसेस आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरु असल्यामुळे या नदीच्या खालील गावांमधील नागरिकांनी अधिक सतर्कता आणि सुरक्षितता बाळगणे आवश्यक असल्याचे पार्टे यांनी आवाहन केले आहे.