पटना : माझी आई दारुचा गुत्ता चालवते. तिनेच मला धंद्याला लावले असून दररोज २० ते २५ जण माझ्यावर बलात्कार करतात. आई, वडील आणि काकांच्या देखरेखीखाली होणा-या या अत्याचारात पोलिसांचा सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप पीडितेने केला आहे. बिहारमधील समस्तीपूर येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी तिच्या आई, वडील आणि काकांवर गंभीर आरोप करत आहे.
पीडितेने पोलीस ठाण्याच्या एसआयसह गावातील प्रमुखावरही गंभीर आरोप केला आहे. हा प्रकार तिच्या आई आणि वडिलांच्या देखरेखीखाली होत असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
पीडितेचे म्हणणे आहे की, तिच्या कुटुंबातील सदस्य पैशासाठी बलात्कार करायला लावतात.
तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. यात पीडितेने सांगितले की, “दररोज २० ते २५ लोक तिच्यावर बलात्कार करतात. आई घरी दारू विकते. पोलीस ठाण्यातील पोलीसही येथे दारू पिऊन तिच्यावर बलात्कार करतात. मी खूप दडपणाखाली जगतेय. मला मदत करायला कोणी नाही. मला मदत करा, नाहीतर हे लोक मला मारतील.
मुलीने व्हिडिओमध्ये तिचा पत्ताही सांगितला आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, तिने पोलिसात तक्रार केली नाही. कारण एसआय मनोज सिंह स्वतः तिच्यासोबत चुकीचे काम करतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी मुलीची आई, वडील आणि एका तरुणाला अटक केली आहे.
वडील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दुकान चालवतात आणि आई घर सांभाळते. मुलीने सांगितले की, तिने एकदा पोलिसांनाही बोलावले होते, त्यानंतर घरावर छापा टाकला होता, पण पैसे देऊन सर्व काही मॅनेज केले होते. त्यानंतर वडिलांनी अत्याचार केले. तेव्हापासून हे अत्याचार सुरु असल्याचे पीडितेने म्हटले आहे.