
मुंबई : मुंबईतील पवई येथील हीरानंदानी मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग लागली आहे. सकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
https://twitter.com/AHindinews/status/1544889414882820097
हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला लागलेली आग खूपच भीषण आहे. अद्यापही आग धुमसतीच आहे. अग्निशमन दलाला लेव्हल २ चा कॉल देण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २० गाड्या पोहचल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.