
नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशभरात १८ हजार ९३० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३५ जणांचा मृत्यू झाला. बुधवारच्या तुलनेत आज सुमारे अडीच हजार अधिक प्रकरणं समोर आली आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाख १९ हजार ४५७ वर पोहोचली आहे. तर, दैनंदिन सकारात्मकता दर आता ४.३२ टक्केवर पोहोचला आहे.
महाराष्ट्रात बुधवारी ३ हजार १४२ लोकांना विषाणूची लागण झाली. तर मुंबईत ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजार ९८१ वर पोहोचली आहे. तर, ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे ३५८ नवीन रुग्ण आढळले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1544893872064516096