Wednesday, March 19, 2025
Homeमहत्वाची बातमीखंबाटकी घाटातील सहापदरी बोगद्याचे कार्य प्रगतीपथावर : नितीन गडकरी

खंबाटकी घाटातील सहापदरी बोगद्याचे कार्य प्रगतीपथावर : नितीन गडकरी

नवी दिल्ली : पुणे-सातारा महामार्गावरील (एनएच-४) खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदा हा प्रत्येकी ३ मार्गिका असलेला दुहेरी बोगदा आहे. सध्या त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

याबाबत ट्वीटर द्वारे नितीन गडकरी म्हणाले की, सातारा-पुणे दिशेला असलेला सध्याचा ‘एस’ वळणमार्ग लवकरच पूर्ण होईल त्यामुळे अपघात जोखमीत मोठी घट होईल. ६.४३ किमी लांबीच्या प्रकल्पासाठी एकूण भांडवली खर्च अंदाजे ९२६ कोटी रुपये आहे आणि मार्च २०२३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांमधील अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत आहे. संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून समृद्धी उलगडत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची मागणी नव भारत करत आहे. बोगद्यामुळे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना त्यांच्या वेळ आणि पैशात बचतीद्वारे थेट लाभ प्रदान करेल. पुणे-सातारा आणि सातारा-पुणे हा खंबाटकी घाटमार्गे अनुक्रमे ४५ मिनिटे आणि १०-१५ मिनिटांचा प्रवास वेळ आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर, या प्रवासाचा सरासरी वेळ कमी होऊन ५-१० मिनिटांवर येईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -