मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने १० टक्के अधिकृत पाणी कपात घोषित केली असली तरी मुंबईत अनेक ठिकाणी ३० टक्क्यांहून अधिक तर अनेक ठिकाणी डोंगराळ भागात पूर्णपणे पाणी कपात सुरु आहे. असा आरोप भाजपने केला आहे. मात्र याबाबत भाजप शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे.
दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने पालिकेने १० टक्के पाणी कपात केली आहे. मात्र ही पाणी कपात अधिकृत १० टक्के जरी असली तरी ३० टक्क्याहुन अधिक पाणी कपात असल्याचा आरोप भाजप ने केला असून याबाबत भाजपचे शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे.
यावेळी भाजपा नगरसेवक शिष्ठमंडळात गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली असून यावेळी पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली आहे. तर यावेळी नगरसेविका उज्वला मोडक, नगरसेवक अभिजित सामंत, कमलेश यादव, हरिष भांदिर्गे आदी उपस्थित होते.
मुंबई शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीमुळे अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागत आहे. असा या गंभीर आरोप केला आहे. तर याबाबत उत्तर देताना महापालिका आयुक्तांनी पाणी समस्येबाबत आढावा घेऊन लवकरात लवकर मुंबईतील पाणी कपात रद्द करण्यात येईल असे आश्वासनही भाजपा शिष्ठमंडळाला दिले आहे.