Saturday, May 10, 2025

कोकणरत्नागिरी

दापोली तालुक्यातील ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना

रत्नागिरी (हिं.स.) : दापोली तालुक्यातील आसूद, मुरूड, कर्देतील ग्रामस्थांना दापोली प्रशासनाने स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत असून दापोली प्रांत अधिकारी शरद पवार, दापोली तहसीलदार वैशाली पाटील, मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी सूचित केले आहे.


या गावांना भेटी देऊन ज्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणच्या नागरिकांना सतर्क केले आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर असेल. त्यामुळे दापोली प्रशासनाने याबाबत नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.


आसूद काजरेवाडीतील ग्रामस्थांना यावर्षीदेखील सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दापोली प्रशासनाने केल्या आहेत. दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांनी तालुक्यातील ज्या घरांना पावसाळ्यात धोका पोहोचू शकतो, अशा घरांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. यावेळी आसूद सरपंच कल्पेश कडू, उपसरपंच राकेश माने, कोतवाल विकास गुरव, ग्रामविकास अधिकारी गौरत उपस्थित होते.

Comments
Add Comment