Thursday, December 12, 2024
Homeमहत्वाची बातमीपर्यटनासाठी लोणावळ्याला जात असाल तर सावधान !

पर्यटनासाठी लोणावळ्याला जात असाल तर सावधान !

पुणे (हिं.स) : पावसाळा सुरू झाल्याने अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडण्यास सज्ज होत आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. त्यात मावळ तालुक्यातील लोणावळा हे तर पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. लोणावळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे पर्यटकांची पाऊले लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. वीकेण्ड असल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांवर शहर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

यासाठी शहर आणि परिसरात तीन ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. मुंबईवरून येताना खंडाळा येथे एक चेक पोस्ट तर पुण्यावरून येताना कुमार चौकात दुसरी चेक पोस्ट, भुशी डॅम आणि टायगर पॉईंटला सहारा ब्रिजवर देखील पोलिसांची करडी नजर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -