Sunday, October 26, 2025
Happy Diwali

बूस्टर डोससाठी सहा महिन्यांचा कालावधी

बूस्टर डोससाठी सहा महिन्यांचा कालावधी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. दुसऱ्या डोसनंतर नऊ महिन्यांनी बूस्टर डोस दिला जात होता. हा कालावधी कमी करत सहा महिन्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयाने आपल्याला निवेदनात म्हटले की, यापूर्वी दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी अर्थात ३९ आठवड्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. पण जगभरात कोरोनाच्या लसींबाबत जे नवे संशोधन सुरू आहे. त्यानुसार नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपच्या स्टँडिंग टेक्निकल सब कमिटीने हे निर्देशित केले आहे की, बूस्टर डोसचा कालावधी नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांवर अर्थात २६ आठवड्यांवर आणण्यात यावा.

त्यामुळे आता १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस घेता येईल. हा बूस्टर डोस या लाभार्थ्यांना प्रायव्हेट कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरवर अर्थात खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क घेता येईल, तर ६० वर्षांवरील नागरिक आणि फ्रन्ट लाइन वर्कर्सना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बूस्टर डोस घेता येईल.

Comments
Add Comment