नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६ हजार १५९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर यादरम्यान २८ मृत्यूची नोंद झाली आहे. देशात दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हीटी दर ३.५६ टक्के इतका आहे.
देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १,१५, २१२ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १४६८४ लोक कोरोनाने बरे झाले आहेत. आतापर्यंत ४,२९,०७,३२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आत्तापर्यंत १,९८, २०,८६, ७६३ इतक्या जणांचे लसीकरण झाले आहे.
दिल्ली येथे मंगळवारी कोरोना विषाणूचे ६१५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १०४३ लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. त्याच वेळी ३ संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. सध्या दिल्लीत कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या २५०७ आहे. दुसरीकडे मुंबईत मंगळवारी ६५९ नवे कोरोना बाधित आढळले. तर १२८९ लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत १० लाख ९० हजार १०३ लोक कोरोनाने बरे झाले आहेत. मुंबईत कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या ६४०९ आहे. मुंबईत रिकव्हरी रेट ९८ टक्के आहे.