Thursday, June 19, 2025

नागपुरात फडणवीसांचे जंगी स्वागत

नागपुरात फडणवीसांचे जंगी स्वागत

नागपुर : राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पहिल्यांदाच दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली.


फडणवीसांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा देवमाणूस असा उल्लेख करण्यात आला आहे. फडणवीसांनी यावेळी याच प्रेमामुळे आपण यशस्वी आहोत, अशी भावनाही व्यक्त केली.


देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर विमानतळावर सकाळी ११.३० वाजता आगमन झाले. यावेळी ढोल ताशाच्या निनादात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विमानतळावर स्वागत केल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चौकाचौकात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.


भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते स्कूटर मिरवणूक काढत सहभागी झाले होते. धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी जाहीर सभा होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा