सोलापूर : संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी अकलूजमध्ये दाखल झाली. अकलूजमध्ये पालखी दाखल होताच, पालखीचे रिंगण पार पडले. जवळपास दोन वर्षानंतर हा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
यावर्षीचे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले रिंगण आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचे तिसरे रिंगण आहे. अकलूजमध्ये आज ११ वाजता भव्य दिव्य रिंगण सोहळा संपन्न झाला. वारकरी आणि अकलूजकर रिंगण सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते. तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे सराटी येथील निरा नदीत स्नान झाल्यानंतर पालखी अकलूज नगरीत पोहचली.
तुकाराम महाराजांच्या पालखीने अकलूजमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत या पालखीचे स्वागत करण्यात आले. अकलूजच्या मैदानात रिंगण सोहळा पार पडला. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती. आजचे तिसरे रिंगण अकलूज मधील माने विद्यालयात झाले.