Thursday, October 30, 2025
Happy Diwali

तांत्रिक बिघाडामुळे स्पाईस जेट कराचीत

तांत्रिक बिघाडामुळे स्पाईस जेट कराचीत

नवी दिल्ली : दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईस जेट एसजी-११चे पाकिस्तानातील कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे. या स्पाईसजेटमध्ये १५० प्रवासी होते या प्रवाशांना सुरक्षित कराचीमध्ये उतरवल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालकाने (डीजीसीए) दिली आहे. तांत्रिक बिघाडामुळे या भारतीय विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे.

डीजीसीए ने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीवरून दुबईला जात होते. पण अचानक डाव्या बाजूच्या टँकमधील इंधन कमी असल्याचे इंडिकेटर लाईट्सचा गजर मिळाल्याने या विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. या संबंधी कराची विमानतळाशी संपर्क केला आणि त्यानंतर हे लॅन्डिंग करण्यात आले. नंतर निरीक्षण केल्यानंतर या टॅंकमध्ये कोणतेही लीक नसल्याचे डीजीसीए ने सांगितले आहे.

स्पाईसजेटच्या प्रवक्ताने या बातमीवर खुलासा करताना सांगितले की, या वेळी कोणत्याही इमर्जन्सी स्थिती जाहीर न करता ही लॅन्डिंग एखाद्या सामान्य परिस्थितीप्रमाणे करण्यात आली. विमानात अशा प्रकारची खराबी असेल अशी कोणतीही माहिती किंवा सूचना आधी देण्यात आली नव्हती. प्रवाशांची काळजी घेतली जात आहे. या प्रवाशांना दुबईपर्यंत नेण्यासाठी एका पर्यायी विमानाची सोय करण्यात येत आहे.

Comments
Add Comment