Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीकाळजी घ्या! विवाह नोंदणी संकेतस्थळांवर होतेय फसवणूक

काळजी घ्या! विवाह नोंदणी संकेतस्थळांवर होतेय फसवणूक

मुंबई पोलिसांचा खबरदारीचा इशारा

मुंबई : विवाह नोंदणी संकेतस्थळांवर अनेकांची फसवणूक होत असल्याने मुंबई पोलिसांनी खबरदारीचा इशारा दिला आहे.

इंटरनेटच्या युगात सायबर क्राईमच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यातच विवाह नोंदणीच्या संकेतस्थळांवर देखील फसवणुकीच्या प्रमाणात मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मुंबई पोलिसांकडून एक ट्विट करण्यात आले आहे.

सावध रहा, प्रसंगावधान राखा, कोणतीही माहिती देण्याआधी समोरच्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घ्या. संशयास्पद वाटल्यास कोणतीही माहिती देऊ नका.

पैशांबाबत घोटाळे
विवाह नोंदणीच्या संकेतस्थळांवर जे लोक पैशांची मागणी करतात, त्यांना ओळखा, तुमचे वैयक्तिक डॉक्युमेंट्स कोणत्याही कारणांसाठी त्यांना देऊ नका. तुम्ही नुकत्याच भेटलेल्या व्यक्तीशी तुमच्या आर्थिक बाबींवर चर्चा करणे सुरक्षित नाही.

सोशल मीडिया वापरा
तुम्ही सोशल मीडियाचा वापर मॅट्रिमोनी वेबसाइटवरील तपशीलांशी पडताळणी करण्यासाठी आणि प्रोफाईल जुळण्यासाठी करू शकता.

वैयक्तिक ईमेल आयडी वापरा
नोंदणी, ईमेल संभाषण, चॅटिंग इत्यादीसाठी तुमचा वैयक्तिक ईमेल आयडी वापरण्यास प्राधान्य द्या.

प्रोफाइल काळजीपूर्वक स्कॅन करा
तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांच्या ऑनलाइन प्रोफाइलवरून बरेच काही सांगू शकता, भाषा, व्याकरण, चॅटिंगची शुद्धलेखन पद्धत इत्यादीकडे लक्ष देऊ शकता.

तक्रार नोंदवा
जर तुम्हाला वाटत असेल की, कोणतेही प्रोफाईल बनावट आहे आणि तुम्हाला कोणत्याही छळाचा सामना करावा लागत असेल तर, संबंधित वेबसाइटवर याची तक्रार ताबडतोब कळवा.

जास्त माहिती देऊ नका
संभाषण करताना सावधगिरी बाळगा आणि तुम्हाला इंटरेस्ट असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी तुमचा वेळ घ्या आणि जर त्यांनी तुमच्या वैयक्तिक जीवनाच्या तपशीलाबद्दल जास्त विचारले तर सावध राहा.

कधीही एकटे भेटू नका
संबंधित व्यक्तीला कधीही एकट्याने भेटू नका, सार्वजनिक ठिकाणी भेटू नका आणि तुमच्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांनाही त्याबद्दल माहिती द्या

फोटो शेअर करू नका
तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात, त्यात तुम्हाला स्वारस्य असल्यास तुमचे छायाचित्र शेअर करणे टाळा.

लगेच भेटू नका
एखाद्याशी ऑनलाइन बोलल्यास संबंधित व्यक्तीला लगेच भेटू नका.

चॅट हटवू नका
भविष्यातील संदर्भासाठी चॅट आणि ईमेल संभाषण सेव्ह करून ठेवा. कोणतीही फसवणूक झाल्यास याचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -