Wednesday, August 13, 2025

अंदमान-निकोबारमध्ये ५.० तीव्रतेचा भूकंप

अंदमान-निकोबारमध्ये ५.० तीव्रतेचा भूकंप

नवी दिल्ली (हिं.स.) : अंदमान आणि निकोबारला मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या बेटांवर सकाळी पावणेसहाच्या सुमारास ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्यामुळे पर्यटक चिंतेत आहेत. अंदमान-निकोबार येथे सोमवारी पावसाळी वातावरण होते. परंतु, सकाळी जमीनीला हदरे बसू लागले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अंदमान-निकोबार येथे झालेल्या या भुंकपाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


भूकंपाचा केंद्रबिंदू हा अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून २१५ किमी अंतरावर होता. भूकंपाचे धक्के जोरदार होते परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाल्याची नोंद झालेली नाही. यापूर्वी देखील ४ जून रोजी अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ते हादरेही तीव्र असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावेळी झालेल्या भुकंपाची ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू पोर्ट ब्लेअरपासून २५६ किमी आग्नेयेला होता. त्या भुंकपातही बेटावर कोणत्याही प्रकारची हानी झाली असल्याची नोंद नाही. अंदमान आणि निकोबार बेट भूकंपाच्या दृष्टीने असुरक्षित श्रेणीत येते. त्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.


दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये सोमवारी म्हणजे एक दिवस आधी भूकंपाचा झटका बसला होता. डोडा जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी होती. सोमवारी दुपारी भूकंपाचा झटका बसला. यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा