Friday, July 11, 2025

आदित्य ठाकरेंचे नाव अपात्र आमदारांच्या यादीतून वगळले!

आदित्य ठाकरेंचे नाव अपात्र आमदारांच्या यादीतून वगळले!

मुंबई : व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून अन्य १४ आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. बहुमत चाचणीच्या वेळी या आमदारांनी व्हिपचे पालन केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


शिवसेनेच्या १५ आमदारांनी काल झालेल्या बहुमताच्या चाचणीच्या वेळी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले नाही. या १५ आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. पण, गोगावले यांनी केलेल्या तक्रारीमध्ये त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आल्याचे गोगावले यांनी सांगितले.


शिवसेनेच्या या १४ आमदारांना व्हीपचे पालन न केल्याने नोटीस देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई आता कायदेशीर मार्गावर पोहोचली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा