Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीबिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू

नाशिक (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या धुमोडी येथे बिबट्याने ७ वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून फरपटत जंगलात नेल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शेतमजुरी करणाऱ्या एकनाथ लखमा वाघ याची ७ वर्षीय मुलगी रुचिता उर्फ रूचा सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराबाहेर रस्त्यावर खेळत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवून तिला फरपटत नेले ही घटना ग्रामस्थांना कळताच तेथे आरडाओरडा सुरू झाला.

ही बातमी लगेचच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला कळताच दोन्ही विभागाच्या तुकड्या तेथे दाखल झाल्या. त्यांनी ग्रामस्थ, इको टीमच्या सदस्यांच्या मदतीने शोध कार्य सुरू करून रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह धुमोडी शिवारातील पंचायती जुना आखाडा येथील करवंदीच्या झाडीत अर्धवट खाल्लेले अवस्थेत आढळून आला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रभान जाधव, सचिन गवळी, कैलास अहिरे, सचिन गांगुर्डे, वनअधिकारी विवेक भदाणे, बोकडे, शिंदे, जगताप, इको टीम चे वैभव भोगले, अभिजीत महाले, सरपंच शांताराम आहेर, निवृत्ती बोडके, मनोहर उदार, कैलास आहेर, केरू आहेर आदींनी मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी मदत कार्य केले. दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -