Saturday, April 19, 2025
Homeमहत्वाची बातमीपूराचा सामना करण्यासाठी रेल्वेच्या ताफ्यात ५ बोटी

पूराचा सामना करण्यासाठी रेल्वेच्या ताफ्यात ५ बोटी

सुरक्षा बोटीत वाढ करण्याचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसाने काही वर्षांपूर्वी बदलापूर वांगणी दरम्यान गोरेगाव जवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. गाडीच्या दोन्ही बाजूला महापूर सदृश्य परीस्थिती निर्माण होत शेकडो प्रवासी रात्रभर या एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले होते. यावेळी एन.डी.आर.एफ आणि रेल्वे सुरक्षा दलाने घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी हेलिकॉप्टर आणि सुरक्षा बोटींचा वापर सर्वाधिक करण्यात आला.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा बोटीत वाढ करण्याचा निर्णय घेत उपनगरीय रेल्वे मार्गावरील पूर परिस्थिती अथवा इतर सागरी संकटांचा सामना करण्यासाठी ५ बोटी आपल्या ताफ्यात तैनात केल्या आहेत. सध्या सुरू असणारा मुसळधार पाऊस पाहता रेल्वे सुरक्षा दलाने आपली विशेष पथके ठिकठिकाणी तैनात केली असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

सुरुवातीला २ बोटी रेल्वे सुरक्षा दलाकडे होत्या. परंतु २०१९ मध्ये बदलापूर वांगणी येथे पूरसदृश्य परीस्थिती निर्माण होत महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकून पडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मान्सूनपूर्व कामे आणि रेल्वे सुरक्षा दलाला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या. यामध्ये विशेष पथके, सुरक्षा बोटींमध्ये वाढ, पूर्वपरीस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष शिबिरे आणि प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -