Tuesday, July 1, 2025

शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत प्रस्ताव जिंकला

शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत प्रस्ताव जिंकला

मुंबई : राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्षात शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज विधासभेत बहुमत प्रस्ताव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाली. तर महाविकास आघाडीला अवघी ९९ मते मिळाली.


महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली. यावेळी भाजपा-शिंदे सरकारने १६४ मतांसहित बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला.


अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख अनुपस्थित राहिले. उशिरा आल्याने त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. तर प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर कालही अनुपस्थित होते आणि आजही अनुपस्थित राहिले. जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने अनुपस्थित होते तर प्रणिती शिंदे या परदेशी आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >