Friday, October 31, 2025
Happy Diwali

लक्ष्मणकडे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी

लक्ष्मणकडे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी

लंडन (वृत्तसंस्था) : कसोटी मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. ७ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात व्ही.व्ही.एस लक्ष्मणकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघाचे नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी संघाचा भाग आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामना ५ जुलैपर्यंत खेळला जाणार आहे आणि कसोटी संघाशी जोडलेले काही खेळाडू आणि स्टाफ पहिल्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध नसतील. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.

यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आयर्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाने २-० अशा फरकाने आयर्लंडचा पराभव केला होता.

Comments
Add Comment