Friday, August 29, 2025

कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला वेग

कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला वेग

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला आता चांगलाच वेग आला आहे. ठरलेल्या वेळेपूर्वीच पहिला बोगदा खोदण्यात यश आलेल्या ‘मावळा’ने (टीबीएम मशीन) दुसऱ्या बोगद्याचा ५९४ टप्पा पार केला आहे.

कोस्टल रोडवर दोन बोगदे असून त्यातील पहिल्या बोगद्याचे काम मावळ्याने ११ जानेवारी २०२२ रोजी पूर्ण केले आणि ३० मार्च रोजी दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू केले होते. तीन महिन्यांत मावळ्याने दुसऱ्या बोगद्याचे सुमारे ६०० मीटर खोदकाम केले. या बोगद्याची एकूण लांबी २ कि.मी. आहे.

कोस्टल रोड बांधणीचे ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ४४ टक्के काम वेळेपूर्वी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड लोकांसाठी सुरू होईल, असे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पालिकेने हा प्रकल्प आणला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये, मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीटपासून वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत सुरू होणाऱ्या १०.५८ कि.मी. लांबीच्या प्रकल्पाचे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३५७ मीटर खोदकाम मावळ्याने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >