हिमाचलप्रदेशात बस दरीत कोसळून १६ जणांचा मृत्यू

मनाली (हिं.स.) : हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १६ जण मृत्यूमुखी पडले आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेने येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली, त्यामुळे हा भीषण अपघात घडला. मृतकांमध्ये काही शाळकरी मुलांचाही समावेश आहे.


यासंदर्भातील माहितीनुसार कुल्लू जिल्ह्यातील शैनशारमध्ये एका खाजगी बसचा अपघात झाला. बस जंगला गावापासून जवळपास २०० मीटर अंतरावर रस्त्यावरुन दरीत कोसळली. दुर्घटनेत १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या प्रवाशांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे. जखमींमध्ये बसच्या चालकाशिवाय प्रवाशांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बस रस्त्यावरुन तब्बल २०० मीटरपर्यंत खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी घडली. बस शैनशारहून औटच्या दिशेने जात होती.


कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, बस अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात ट्वीटरवर संदेश जारी करत पंतप्रधान म्हणाले की, या दु:खद प्रसंगी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. मला आशा आहे की, जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल.


स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वोतोपरी मदत करत आहे. यासोबत पंतप्रधानांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत मंजूर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे