Saturday, July 5, 2025

धायरीतील शेततळ्यात दोन शाळकरी मुले बुडाली

धायरीतील शेततळ्यात दोन शाळकरी मुले बुडाली

पुणे (हिं.स.) : शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सिंहगड रस्ता परिसरातील धायरीत रविवारी घडली.


सूरज शरद सातपुते (वय १४), पुष्कर गणेश दातखिंडे (वय १३, दोघे रा. नालंदा हायस्कूलशेजारी, धायरी) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. धायरीतील रायकर मळा भागात खंडोबा मंदिराजवळ शेततळे आहे.


सूरज, पुष्कर आणि त्यांचा मित्र अथर्व चव्हाण खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून काही अंतरावर शेत आहे. सीमाभिंतीवरुन उडी मारुन सूरज, पुष्कर आणि अथर्व शेतात गेले. शेततळ्यात सूरज आणि पुष्कर पोहण्यासाठी उतरले अथर्व हा काठावरच थांबला होता.

Comments
Add Comment