शिंदे गटातील आमदार राहत असलेल्या पणजीतील हाॅटेलातून दोघांना अटक

  81

पणजी (हिं.स.) : बंडखोर शिंदे गटातील आमदार विशेष सुरक्षा व्यवस्थेत शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले. मात्र याआधी हा गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून दोघांना अटक करण्यात आली. यातील सोनिया दोहान ही हरयाणाची, तर श्रेय कोटीयाल हा उत्तराखंड राज्यातील असून ते दोघे राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदार राहत असलेल्या हॉटेलमध्ये बोगस ओळखपत्राद्वारे प्रवेश करून राहणाऱ्या दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. बनावट नावे आणि बोगस ओळखपत्रांच्या आधारे ते दोघे रूम नंबर ६२५ मध्ये वास्तव्यास होते. बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी दुहा येथे आल्या असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी कलम ४१९, ४२० अंतर्गत बोगस ओळखपत्र देणे आणि भलत्याच व्यक्तीच्या नावे हॉटेलमध्ये राहणे या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही बंड केले होते. त्यानंतर आमदारांना पळवून आणण्यात सोनिया दुहा यांची प्रमुख भूमिका असल्याचेही आता समोर येत आहे.


पणजीचे पोलीस निरीक्षक सूरज गवस यांनी याबाबत सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेले दोघे जण बनावट नावाने हॉटेलमध्ये दिवसभर थांबले होते आणि ओळख बदलून राहिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे ते हेरगिरी करत असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या आधारे त्यांना अटक केली आहे. मात्र अटक करण्यात आलेले दोघे जण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का याबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही.

Comments
Add Comment

Uttarkashi : धरालीतील 'कल्प केदार' मंदिराची दुर्दैवी पुनरावृत्ती; ८० वर्षांपूर्वी सापडले, आज पुन्हा गडप

धरालीचे प्राचीन शिवमंदिर ढगफुटीच्या तडाख्यात उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात

राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात

Uttarkashi : उत्तरकाशीत पूर आपत्तीची झळ अधिक तीव्र; पुराच्या तडाख्यात ६० बेपत्ता, मदतकार्यासाठी शर्यत सुरू

उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात

Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी