Monday, March 24, 2025
Homeदेशअमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांना अटक

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली (हिं.स.) : दोन वर्षांच्या कालखंडानंतर अमरनाथ यात्रा यावर्षी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू काश्मीरमधील तुकसानमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या फैजल अहमद डार आणि तालिब हुसेन या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांसाठी हे मोठे यश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी फैजल हा लष्कर ए तोयबाचा पहिल्या फळीतील दहशतवादी आहे. दोघांकडून दोन एके-४७ (AK-47) रायफल, ७ ग्रेनेड आणि एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी दोन लाख, तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. अधिक चौकशीत पोलिसांना अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची माहिती समोर आली.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला होणार होता. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये तालिब हुसेनचा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तालिबने यापूर्वी राजौरीमध्ये दोन बॉम्बस्फोटाची चाचणी घेतली होती. त्याने फैजलशी संपर्क साधला होता. त्यानंतर हे दोघे तुकसान जिल्ह्यातील गावात लपून बसले होते. त्यांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना अटक केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -