बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रिषभ पंतने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने अडचणीच्या वेळी १११ चेंडूंत १४६ धावांची गरजेची खेळी खेळली. त्याने ८९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या खेळीसह त्याने भारताचा माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे.
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रिषभ पंतने १९ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १४६ धावा कुटल्या. या सामन्यात त्याने ८९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील पाचवे कसोटी शतक होते. या शतकासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारा भारतीय यष्टीरक्षक बनलाय. यापूर्वी हा विक्रम एम.एस धोनीच्या नावावर होता. धोनीने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ९३ चेंडूंत शतक झळकावले होते.
एजबॅस्टनच्या १२० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एका फलंदाजाने १०० पेक्षा कमी चेंडूंत शतक झळकावले आहे. या मैदानावर रिषभ पंत सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर या मैदानावर शतक ठोकणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरलाय. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने या मैदानावर शतक झळकावले आहे.