Friday, June 20, 2025

नौदलाच्या पूर्व ताफ्यातील जहाजांनी दिली सिंगापूरला भेट

नौदलाच्या पूर्व ताफ्यातील जहाजांनी दिली सिंगापूरला भेट

नवी दिल्ली (हिं.स.) : नौदलाच्या पूर्व ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग संजय भल्ला, रिअर ॲडमिरल, एनएम, यांच्या नेतृत्वाअंतर्गत भारतीय नौदलाची दोन जहाजे ‘सह्याद्री’ आणि ‘कदमत’ दिनांक ०१ ते ०३ जुलै या दरम्यान दक्षिण पूर्व आशियामधील सिंगापूर येथे तैनात करण्यात आली असून, सल्ला यांनी या कालावधीत सिंगापूरला भेट दिली. आयएनएस (INS) सह्याद्री ही पूर्णतः स्वदेशी बनावटीची रोल स्टेल्थ युद्धनौका आहे, तर आयएनएस (INS) कडमॅट ही आणि स्वदेशी बनावटीची एक एस डब्ल्यू कार्वेट आहे.


या भेटीदरम्यान,आयएनएस वरील कर्मचाऱ्यांनी सिंगापूरच्या नौदलासोबत (RSN) परस्पर सहकार्य आणि आंतरकार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने झालेल्या व्यावसायिक संवादात भाग घेतला. या सामाजिक आणि अनौपचारिक देवाणघेवाणीचा उद्देश परस्परांच्या नौदलांमधील संबंध दृढ करणे आणि सामंजस्य वाढविणे हा आहे.


या जहाजांच्या भेटीमुळे सागरी सहकार्य वाढवण्यात आणि सिंगापूरशी भारताचे असलेले मैत्रीचे बंध दृढ होण्यात मदत होणार असून, त्यामुळे या प्रदेशातील सुरक्षा आणि स्थैर्य आणखी मजबूत होईल. या जहाजांच्या भेटीवेळी सिंगापूर आर्म्ड फोर्सेस (SAF) दिनाचेही औचित्य साधले गेले. रिअर ॲडमिरल संजय भल्ला (FOCEF) यांनी सिंगापूरमधील क्रांजी वॉर मेमोरियलला भेट दिली आणि दुसऱ्या महायुद्धात कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments
Add Comment