मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थातच ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. ५ जुलै रोजी संजय पांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
तीन दिवसांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झालेले संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे एक आहेत. ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे त्यामुळे आता पांडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचे नाव समोर आले आहे. ते मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर असताना त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर बऱ्याचवेळा वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. त्याच आरोपाखाली त्यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे.