Monday, March 24, 2025

बाबू

डॉ. विजया वाड

बाबू, प्रेमाला उच्च, नीच स्तर नसतो. प्रेम भिन्न लिंगी असतं. तेव्हा आवड असली, की ते दृढ व्हावं.” मंजू म्हणाली.
“आवड एवढाच निकष असेल, तर मग ठीक आहे.” बाबू म्हणाला.
“बाबू, मला तू खूप आवडतोस.”
“थँक्स मंजूजी मंजू.”
“आवडलं मला.”
“काय आवडलं? मंजू म्हटलेलं? मंजूजी?”
“मंजू म्हटलेलं. ए मंजू.”
“ए मंजू.”
“बाबू, आय लव्ह यू.”
“मला ठाऊक आहे ते मंजू. या नात्याला नाव नाही देता येणार. खूप अवघड आहे ते.”
“सामाजिक न्यायानं अवघड असेल पण ‘प्रेम’ बहुआयामी असतं.
मला तरी असं वाटतं.”
“बाबूला तसं वाटत नाही मंजू. एक क्लार्क त्यातून हेडक्लार्क एका शिपायावर प्रेम करते, ये पटता नाही लोगोंको.”
“लोक गेले बाराच्या भावात. आय डोंट केअर.”
“बट आय डू केअर मॅडम. मी दूरचा विचार करतो.”
“किती दूरचा?”
“लग्नाचा.”
“लग्न? करूया आपण? माझी तयारी आहे.”
“पण लग्नानंतर एका खोलीत राहावं लागेल.”
“मला कल्पना आहे. ती खोली कोंदट आहे. खिडक्या परत कराव्या लागतील.”
“हं! बाबू! ही कल्पना छान आहे.”
“घरी नळ घेऊया.”
“बाहेरून पाणी आणावं लागतं?”
“सगळं नाही. वीस मिनिटं पाणी येतं घरी. पण काँपिटिशन खूप असते. त्यात एक हंडा, कळशी, बादली इतकं येतं. पुरतं पाणी. एकट्या माणसाला. मग बाहेरून आणावं लागेल. तू आलीस की!”
“काकू, आई जपून वापरतात.”
“मग मी आले की आणू की बाहेरून.”
“तेच तर.” “माझी बायको राणीच्या रुबाबात ठेवायचीय मला.”
“बाबू sss…”
“काय मंजू?”
“मला हंडा, कळशी उचलायला लाज वाटत नाही.”
“पण राणीचा रुबाब?”
“तुला राणी वाटते ना? मस्तय की! बाबू, राणी बिणी सगळ्या मानण्याच्या गोष्टी आहेत. प्रेम महत्त्वाचं.”
“ते तर आहेच गं. प्रेम व्यक्त करायला ऊठ काकू, सूठ आई!”
“आवडलं. एक दोरी लावू. पडदा टाकू. आई, काकू अल्याड. तू, मी पल्याड.”
“झक्कास आयडिया आहे. प्रेम करताना भीती नाही.” ती म्हणाली.
“लोक काय म्हणतील याची काळजी वाटते गं मंजू.”
“लोक गेले तेल लावीत.”
“उद्या पेपरला येईल बातमी. क्लार्क- हेडक्लार्क मॅरीज द ऑफीस बॉय” बाबू म्हणाला.
“अरे फुकट प्रसिद्धी!”
“माझी मनाची तयारी होऊ दे. थोडी थांब मंजू!”
“बरं बाबू.”
“आई, काकूला पण कल्पना देतो.”
“दे बाबू…”
“लवकरच दे.”
“आजच देतो.”
“उत्तम. उत्तम बाबू.” मंजूचा चेहरा चांदण्यागत खुलला फुलला. बाबू बसस्टॉपवर मंजूला सोडून घरी आला.
“मी लग्न करतोय काकू, आई.”
“कुणाशी? त्या नट मोगरीशी? आत्ता आलेली?” काकूनं विचारलं.
“एका खोलीत राहायची तयारी आहे? का तुला पळवणार?” आईने डोळे बारीक करीत म्हटलं.
“मी. लग्न करतोय! मी, माझ्या घरी बायकोला आणणार.”
“हे बरंय.” काकू म्हणाली.
“तू शिपाई, ती साहेब.” आईने जाणीव करून दिली.
“मग काय झालं आई? ही मुंबई आहे. यहाँ सबकुछही जायज है.”
“बाबू, लगीन ही वेगळी गोष्टंय. तिच्या घरी…” आई म्हणाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -