Tuesday, January 20, 2026

रविवारी पहा 'बहुरूपी अशोक सराफ'

रविवारी पहा 'बहुरूपी अशोक सराफ'

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अशोक सराफ यांच्या वयाचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त 'बहुरूपी अशोक सराफ' हा कार्यक्रम रविवार ३ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर दाखवण्यात येणार आहे.

अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखले जाते. अशोक सराफ यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.

वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही त्यांच्यात असलेली ऊर्जा, त्यांच्यात असलेला दिलखुलासपणा, अचूक विनोदाचे टायमिंग, कामात असलेली स्थिरता, अभिनयाविषयी असलेले प्रेम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

अशोक मामांचा हा यशस्वी प्रवास मोठ्या थाटामाटात एका सोहळ्याच्या रूपात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात अशोक मामांचा दिग्गजांकडून झालेला कौतुक सोहळा आणि त्याच सोबत काही रंजक सादरीकरण देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. जितेंद्र, एकता कपूर, सुनील गावस्कर यांनी देखील उपस्थिती दर्शवली.

Comments
Add Comment