Tuesday, July 16, 2024
Homeदेश‘तुम्ही करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत’ पंतप्रधान मोदींकडून मितालीला शुभेच्छा

‘तुम्ही करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत’ पंतप्रधान मोदींकडून मितालीला शुभेच्छा

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने काही दिवसापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीच्या क्रिकेटमधील कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मिताली राजने तिच्या ट्विटर हँडलवरून एक पत्र शेअर करत स्वत: पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ‘आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एवढे प्रेम, प्रोत्साहन मिळणे ही सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी हे माझ्यासह लाखो लोकांसाठी आदर्श आणि प्रेरणा आहेत. त्याच्या प्रोत्साहनपर शब्दांनी मी भारावून गेली आहे’, असे मितालीने ट्वीट केले.

पीएम मोदींनी पत्रात लिहिले आहे की, काही आठवड्यांपूर्वी तुम्ही क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन लाखो चाहत्यांना नाराज केले. ज्या करोडो लोकांसाठी तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व केलेत, त्यासाठी मी शुभेच्छा देतो. तुम्ही करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहात. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात कोविड-१९ च्या प्रतिकूल परिस्थितीत लोकांना मदत केल्याबद्दल तुमचे कौतुक वाटते. याशिवाय इतर अनेक सामाजिक कार्यातही तुम्ही सहभाग घेतला आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -