नवी दिल्ली (हिं.स.) : पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान मधून ३ वर्षीय बालक चुकून सीमा पार करून भारतात आला होता. पण सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ते बालक पुन्हा पाकिस्तानी रेंजर्स कडे सोपवले. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी आज, शनिवारी याबाबत माहिती दिली.
पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बीएसएफ जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाजवळ एक मूल रडताना दिसले.
त्यानंतर बीएसएफ फील्ड कमांडरने पाकिस्तानी रेंजर्ससोबत तात्काळ फ्लॅग मीटिंग घेण्याची ऑफर दिली जेणेकरून मुलाला परत सुपूर्द करता येईल. काही वेळातच मुलाला त्याच्या वडिलांच्या उपस्थितीत रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.