मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने हा निर्णय घेतला असून या संघटनेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण आहेत. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा पवारांसाठी धक्का मानला जात आहे. जिल्हा संघटना आणि मल्लांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचे कळते. आजी आणि माजी मल्लांकडून गेल्या अनेक वर्षात तक्रारी केल्या जात आहेत. या वर्षी देखील परिषदेविरोधात तक्रारी दिल्या गेल्या होत्या अशी माहिती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, महासंघाच्या सूचनांनुसार १५ आणि २३ वयोगटांतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केली नाही. त्या विरोधात जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होणार आहे. हीच समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह अन्य बाबींवर लक्ष देणार आहे.
यावर भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. आम्ही १५ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार दिला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते. याशिवाय राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत बऱ्याच तक्रारी येत होत्या. यात जिल्हा संघटना आणि खेळाडूंच्या तक्रारींचा समावेश आहे. आमच्याकडून त्यांना संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता, पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर या सर्व तक्रारींची दखल घेत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बृजभूषण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. यामुळेच आता महासंघाच्या या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…